You are currently viewing जय श्री राम घोषणांनी व भगवे झेंडे धारी बाईक रॅलीने वेंगुर्ला शहर भगवामय

जय श्री राम घोषणांनी व भगवे झेंडे धारी बाईक रॅलीने वेंगुर्ला शहर भगवामय

राम मंदिर समर्पण अभियान वेंगुर्ला कार्यालयाचे थाटात उदघाटन

वेंगुर्ला
श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान जिल्हा सिंधुदुर्ग तालुका वेंगुर्ला येथील कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी भव्य बाईक रॅली वेंगुर्ला शहरात काढण्यात आली. जय श्री राम या घोषणांनी व भगवे झेंडे धारी बाईक रॅलीने अवघे वेंगुर्ला शहर भगवामय बनले होते. कार्यालय उदघाटन कार्यक्रमही श्री कुर्ले बुवा यांच्या हस्ते संपन्न झाला. वेंगुर्ला येथे प्रथम श्री. देव रामेश्वर मंदिर येथे महाआरती करून बाईक रॅली ला सुरवात झाली. या प्रसंगी समस्त रामभक्तांनी यात उपस्थिती दर्शवली. रॅलीमुळे सर्व वातावरण राममय झाले होते. घोषणांनी आसमंत दुमदुमत होता.

या रॅलीमधील महिला आणि तरुण यांचा सहभाग लक्षणीय होता. महिला आणि तरुणवर्ग या अभियानाशी जोडला गेला आहे हे रॅलीतून निदर्शनास आले. दरम्यान कार्यालयाचे उद्घाटन श्री कुर्ले बुवा याच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले तसेच दीपप्रज्वलन व भारत माता, श्रीराम प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमास सुरवात झाली. या प्रसंगी वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप, ऍड. सूर्यकांत खानोलकर, सातेरी ट्रस्टचे रवींद्र परब तसेच अनंत आठल्ये गुरुजी, छायाताई कुबल, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, श्री अरुण गोगटे, बागलकर सर, खवणेकर सर, जिल्हा अभियान संयोजक श्री.सतीश घोटगे, वेंगुर्ला तालुका संयोजक गिरीश फाटक, सहसंयोजक मंदार बागलकर, नगरसेविका श्रेया मयेकर, साक्षी कुबल,माजी नगरसेविका सुषमा खानोलकर, तसेच असंख्य राम भक्त उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन मंदार बागलकर यांनी केले प्रास्ताविक गिरीश फाटक यांनी केले तसेच प्रमुख मार्गदर्शन श्री सतीश घोटगे यांनी राम मंदिर समर्पण अभियाना बाबत सविस्तर माहिती दिली आणि या राम मंदिर बांधणीत केवळ निधी संकलन भाग नसून प्रत्येकाच्या मनामनात आणि घराघरात राममंदिर पोहचले पाहिजे हा विषय असल्याचे सांगितले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =