You are currently viewing जिल्हास्तरीय शालेय व नेहरू कप हॉकी स्पर्धेत सैनिक स्कूलचे घवघवीत यश

जिल्हास्तरीय शालेय व नेहरू कप हॉकी स्पर्धेत सैनिक स्कूलचे घवघवीत यश

*जिल्हास्तरीय शालेय व नेहरू कप हॉकी स्पर्धेत सैनिक स्कूलचे घवघवीत यश*

आंबोली
क्रीडा व युवक संचालनालय,जिल्हा क्रीडा परिषद, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे जिल्हा स्तरीय शालेय हॉकी स्पर्धा व नेहरु कप हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये सैनिक स्कूलच्या 14 17 व 19 वर्ष वयोगटातील संघांनी शालेय हॉकी स्पर्धेत सर्वोच्च स्थान प्रस्थापित केले .तसेच नेहरू कप हॉकी स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात सैनिक स्कूलचा संघ विजयी ठरला.
शालेय स्पर्धेत 14 वर्षे शालेय मुले वयोगटात 2 संघानी स्टेपिंग स्टोन कोलगाव व सैनिक स्कूल आंबोली यांनी सहभाग घेतला. सैनिक स्कूलच्या स्वप्निल आनंदाचे व श्रेयश मुसळे यांनी प्रत्येकी एक गोल केला .सैनिक स्कूलच्या संघाने दोन शून्य या गोल फरकाने हा सामना जिंकला.
17 वर्ष शालेय मुले वयोगटात सैनिक स्कूल आंबोली आणि स्टेपिंग स्टोन कोलगाव यांच्यामध्ये अंतिम सामना झाला त्यात सैनिक स्कूलच्या आदर्श अष्टेकर दोन गोल, पार्थ नाईक एक गोल आणि पावन परब याने एक गोल असे चार गोल केले आणि चार शून्य या गोल फरकाने सैनिक स्कूल संघ विजयी ठरला.
19 वर्ष मुले वयोगटात सैनिक स्कूल आंबोली चा संघ विजयी झाला . तसेच जिल्हास्तरीय नेहरू कप हॉकी स्पर्धेत सैनिक स्कूलच्या 17 वर्षे वयोगटातील संघाने मिलाग्रीस स्कूलच्या संघासोबत झालेल्या अंतिम सामन्यात आदर्श अष्टेकर दोन गोल तर पावन परब याने एक गोल करून तीन झिरो गोल फरकाने सैनिक स्कूलला विजय मिळवून दिला. सैनिक स्कूल च्या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक श्री. मनोज देसाई, शिवराज पवार, जयराम कोळी व सतीश आईर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी क्रीडापटूंचे व क्रीडा प्रशिक्षकांचे संस्था अध्यक्ष श्री सुनील राऊळ, सचिव श्री जॉय डानटस, संचालक मंडळ, कार्यालयीन सचिव श्री दीपक राऊळ , प्राचार्य नितीन गावडे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले व विभाग स्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा