पोखरण ग्रामपंचायत निवडणूक शांततेत…

पोखरण ग्रामपंचायत निवडणूक शांततेत…

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील पोखरण-कुसबे ग्रुप ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुक मतदानाला शुक्रवारी सकाळी ७.३० पासून सुरवात झाली. एकूण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.

कुसबे गावात कोरोनाचे नियम काटेकोर पण बजावत सर्व ग्रामस्थांनी शांततामय वातावरणात मतदान केले. कसबे गावात वार्ड क्र. 1 मध्ये  ६५.३६% मतदान झाले असून एकूण ३३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच वार्ड 1 मधून विजय सोनू महाडेश्वर यांची  बिनविरोध म्हणून निवड झाली.

पोखरण गावात देखील ७.३० वा. पासुन मतदनाला सुरवात झाली.पोखरण गावात वार्ड २ मध्ये ६०% मतदान केले गेले व एकूण ३०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर वार्ड ३ मध्ये ६४% मतदान झाले असून एकूण ३५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

पोखरण कुसबे ग्रामस्थांचे व उमेदवारांचे लक्ष 18 जानेवारी कडे लागले आहे. कारण हाच तो दिवस जो उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट करील.

प्रतिक्रिया व्यक्त करा