जीवनातील परिवर्तनासाठी विकासाला प्राधान्य देणाऱ्या भाजपला साथ द्या

जीवनातील परिवर्तनासाठी विकासाला प्राधान्य देणाऱ्या भाजपला साथ द्या

आमदार नितेश राणे यांचे आवाहन

कोलगांव कोकण कॉलनी येथील मतदारांशी साधला संवाद

सावंतवाडी:
रोटी कपडा आणि मकान या तीन गरजांबरोबरच आज नेटवर्क ही देखील प्रत्येकाची महत्त्वाची गरज बनली आहे. कोरोना च्या कालावधीत शिक्षणाबरोबरच नोकरी व व्यवसायासाठी ही नेटवर्क फार महत्त्वाचे ठरले. आज अनेक तरुण घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून नोकरी व व्यवसाय सांभाळत आहेत. मात्र, ग्रामीण भागात नेटवर्कची फारच कमतरता भासत आहे. कारण या भागाचे सेनेचे खासदार हे येथील बीएसएनएल नेटवर्क प्रमाणेच नॉटरिचेबल असतात. मात्र तुम्ही विश्वास दाखवा तुम्ही जागा निश्चित करा तुम्हाला हवा असलेल्या जागेत खाजगी कंपनीच्या टॉवर नक्कीच देऊ असे स्पष्ट करतानाच महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे संधी द्या तुमचा विकास करण्यास आम्ही बांधील आहोत असा विश्वास भाजपचे युवा नेते आ. नितेश राणे यांनी व्यक्त केला.
कोलगाव कोकण कॉलनी येथे मतदारांशी संवाद साधताना त्यांनी मतदारांसमोर विकासाचे व्हिजन ठेवले.
या भेटीत स्थानिकांनी या भागात खाजगी टॉवरची मागणी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली होती. ही मागणी लवकरच पूर्ण करू असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. त्यावेळी भाजप चिटणीस महेश सारंग, सावंतवाडी पालिका सभापती उदय नाईक, नगरसेवक ॲड. परिमल नाईक, मागासवर्गीय सेल अध्यक्ष अब्दुल साठी, माजी सरपंच राजन कुडतरकर, दादू कविटकर आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या कार्यकाळात राज्य सरकारने ग्रामपंचायतला कोणतेही सहकार्य केले नाही. त्यामुळे गावांचा विकास खोळंबला. हा रखडलेला विकास मार्गी लावण्याची जबाबदारी आमची आहे. आपला विकास कोण करू शकतो याचा मतदार म्हणून दृष्टिकोन ठेवा व विकासाला प्राधान्य देणाऱ्या भाजपला तुमची सर्व कामे करण्याची जबाबदारी आमची आहे, असा विश्वासही आ. नितेश राणे यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी शहराला लागून असलेली कोलगाव ग्रामपंचायत हे जिल्ह्यातील महत्वाची ग्रामपंचायत आहे. सावंतवाडी शहराप्रमाणेच कोलगावचाही विकास व्हावा यासाठी भाजपला साथ द्या. खासदार नारायण राणे, आमदार रवींद्र चव्हाण व अन्य भाजप लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गावचा विकास आणि निश्चितच मार्गी लावू. राज्य सरकार ऐकत नसेल तर त्याला वाकवण्याची ताकद आमच्यात आहे. तुमच कोणतेही काम असो अगदी विधिमंडळातही असेल त्याची जबाबदारी आमची आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा