You are currently viewing जनाची नाही, मनाची तरी…

जनाची नाही, मनाची तरी…

काका कुडाळकर यांचा प्रहार

 

सध्या या जागतिक कोवीड साथीच्या काळात राजकारण न करता एकदिलाने काम केलं पाहिजे. पालकमंत्री उदय सामंत यांनी ही सर्व पक्षांची साथ घेऊन काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यालाही आपल्या नेत्यांनी पाठींबा दिला आहे. अशावेळी खरं म्हणजे राजन तेली यांनी त्यांचेच म्हणजे भाजपचे नेते नेते केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांना कोव्हिड काळात मदत करताना राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे, त्याप्रमाणे पक्षांचं काम करावे. मुळातच राज्य सरकार सक्षम पणे या आजाराचा सामना करत आहे. गतवर्षीपेक्षा या वर्षी दुप्पट रुग्णसंख्या होऊनही शासकीय आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे. त्यालाच सरकारची साथ उत्तम लाभत आहे. आमचे नेते राज्याचे आरोग्य मंत्री नामदार राजेशजी टोपे साहेब यांनी तब्बल 32 डॉक्टर जिल्ह्याला दिले. राजन तेली आपल्याला रोखलं कोणी ?

 

आजवरच्या जिल्ह्याच्या इतिहासात एवढ्या संख्येने डॉक्टर पहिल्यांदाच जिल्ह्याला उपलब्ध झाले आहेत हे ही राजन तेली यांनी विसरू नये. तर राष्ट्रवादीच्या वतीने आमचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी तातडीने मुंबईला जाऊन माननीय मंत्री महोदय नामदार जितेंद्रजी आव्हाड साहेब यांचे कडून तब्बल 50 कॉटचे कोव्हीड सेंटर मंजूर करून घेतले आहे. त्यामुळे जनाची काय वा मनाची काय ती लाज राजन तेली यांनी बाळगावी. कारण तेही केंद्रात सत्तेत आहेत. या जिल्ह्यासाठी कोव्हीड काळात काय केले ते सांगावे? व मनाची लाज बाळगून काहीतरी केंद्राकडून करता येईल का पाहावे. काम करण्यास विचारावे लागत नाही.

जरा त्यांनी त्यांच्यापेक्षा ज्युनिअर असणाऱ्या त्यांच्याच पक्षाचे आमदार नितेश राणे यांच्याकडून शिकावे. ते ही न सांगता आपल्या मतदारसंघात काम करत आहेत .तर काही सामाजिक संस्थाही न बोलता सेवा करताहेत. जमातुल मुस्लिमीन वेल्फेअर सोसायटी कडून 45 ऑक्सिजन पाच हजार पाण्याच्या बाटल्या गाजावाजा न करतात रुग्णाला दिले आहे. त्यामुळे राजन तेली सरकार कमी पडत आहे म्हणून नाही तर सामाजिक जाणीव असेल तर आपण लवकरात लवकर व्हेंटिलेटर ऑक्‍सिजन ची जबाबदारी घ्यावी, असे आव्हान राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =