You are currently viewing शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कारांच्या सुधारित नियमावलीकरिता सूचना….

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कारांच्या सुधारित नियमावलीकरिता सूचना….

अभिप्राय पाठविण्याचे आवाहन

मुंबई

शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारामध्ये शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती खेळाडू, साहसी, दिव्यांग खेळाडू पुरस्कार देण्यात येतात. याबाबतची नियमावली शासन निर्णय २४ जानेवारी २०२० नुसार निर्गमित केलेले आहे. या नियमावलीमध्ये सुधारणा करावयाच्या असल्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय विभागाने यांनी कळविले आहे.

शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय २२ जानेवारी २०२१ पर्यंत मागविण्याचे शासनाने निर्देशित केलेले आहे. पुरस्काराच्या प्रस्तावित सुधारणा नियमावलीची प्रत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

पुरस्कार नियमावलीच्या प्रस्तावित सुधारणांबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांनी आपल्या सुचना/अभिप्राय dsysdeskI4@gmail.com किंवा desk14.dsys-mh@gov.in मेलवर २२ जानेवारी २०२१ रोजी पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांचेमार्फत करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय उपसंचालक कार्यालय अथवा क्रीडा व युवकसेवा संचालनालय शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे, बालेवाडी, पुणे यांचेशी संपर्क साधावा, असे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × five =