You are currently viewing साटेली भेडशीतील वाटेचा वाद अखेर मिटला

साटेली भेडशीतील वाटेचा वाद अखेर मिटला

संयुक्त बैठकीत तोडगा; रस्ता तयार करण्याचे काम सुरु

दोडामार्ग

साटेली भेडशी येथील वाटेचा वाद अखेर तात्पुरता मिटला. संबंधित जमीनमालक, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग,तहसीलदार आणि स्थानिक ग्रामस्थांच्या संयुक्त बैठकीत तोडगा निघाल्याने खोदाई केलेल्या ठिकाणी पाईप घालून रस्ता तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले.

पाणी साचून शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने ग्रामस्थांनी रस्त्याची मागणी केली.त्यासाठी गटार मारण्याची मागणी होती; पण बांधकामच्या कर्मचाऱ्यांनी गटार खोदले;पण मुले व गावकऱ्यांना जाण्यासाठीचा मार्ग बंद झाला.त्यामुळे तणाव निर्माण होऊन रास्ता रोकोही झाला. सोमवारी सायंकाळपर्यंत यावर तोडगा न निघाल्याने प्रभारी तहसीलदार संकेत यमगर व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त बैठक मंगळवारी झाली. बैठकीत श्री.यमगर यांनी तात्पुरता रस्ता खुला करून खासगी जमीन मालक यांनी संमती दिल्याने अखेर ग्रामस्थ यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. बैठकीला पोलिस निरीक्षक अरुण पवार, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले, भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी,एकनाथ नाडकर्णी, कसई दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, साटेली-भेडशी सरपंच लखू खरवत, उपसरपंच गणपत डांगी, ग्रामविकास अधिकारी ज्योती डोंगरदिवे, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत धर्णे यांसह मायकल लोबो, इसाक खेडेकर व तेथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा