You are currently viewing बांदा येथे १२ जानेवारीला भव्य सूर्यनमस्कार दिन सोहळा…

बांदा येथे १२ जानेवारीला भव्य सूर्यनमस्कार दिन सोहळा…

बांदा
पतंजली योग समिती बांदा पंचक्रोशी व गोवा राज्य पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांतीचे औचित्य साधून मंगळवार दिनांक १२ रोजी सकाळी साडेसात वाजता येथील खेमराज प्रशालेच्या पटांगणावर भव्य सूर्यनमस्कार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात ३०० हुन अधिक विद्यार्थी, मान्यवर सूर्यनमस्कार घालणार आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार आहे. बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह मकरंद तोरसकर अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, पंचायत समिती सभापती मानसी धुरी, उपसभापती शीतल राऊळ, सरपंच अक्रम खान, माजी सरपंच मंदार कल्याणकर, मराठा समाज अध्यक्ष बाळू सावंत, मधुकर देसाई, इंडियन योगा असोसिएशनचे गोवा विभाग अध्यक्ष कमलेश बांदेकर, उपाध्यक्ष विश्वास कोरगावकर, योगशिक्षक तुळशीदास मंगेशकर, नाबर प्रशालेच्या मुख्याध्यापिका मानली देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात नाबर, खेमराज प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, मान्यवर सहभागी होणार आहेत. उपस्थित राहून सहभागी होण्याचे आवाहन विकी केरकर, सुदन केसरकर, संजय नाईक, अनिल मणियाद, नंदादीप केळुस्कर, नंदकिशोर नाईक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 15 =