You are currently viewing संवाद मिडियासाठी नावाजलेले साहित्यिक आपले साहित्य पाठवतात

संवाद मिडियासाठी नावाजलेले साहित्यिक आपले साहित्य पाठवतात

संवाद मीडिया करतो साहित्याची कदर

संपादकीय….

महाराष्ट्राच्या मातीत अनेक साहित्यिक होऊन गेले. समाजाच्या जडणघडणीत साहित्यिकांचा फार मोठा वाटा आहे. समाज आणि साहित्य यांचं एक अतूट नातं आहे. साहित्यिकांच्या साहित्यातूनच समाज मन घडत असतं. समाजात परिवर्तन होत राहतं. समाजातील वास्तव अनेक नामवंत साहित्यिकांनी आपल्या कथा, कादंबरी, काव्य, लेख , लोकसाहित्य आदींमधून समाजापुढे मांडलं आहे.
संवाद मीडिया हा साहित्यिक आणि समाज यामधील दुवा आहे. अनेक नामवंत साहित्यिकांचे स्वलिखित विचार, काव्य, लेख आदी संवाद मीडिया आपल्या चॅनेलच्या माध्यमातून प्रसिद्धीस देत असतो. त्यामुळे संवाद मिडियाकडे अनेक नामवंत साहित्यिक आपले दर्जेदार साहित्य प्रसिद्धीसाठी पाठवतात. साहित्य क्षेत्राची सेवा या उद्देशानेच संवाद मीडिया साहित्यिकांचे साहित्य प्रकाशित करत असतो. संवादच्या या उपक्रमामुळे अनेक नामवंत, राज्य तसेच राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त, देश-विदेशातील साहित्यिकांचे साहित्य समाजाच्या तळागाळापर्यंत पर्यंत पोहचत असून वाचले जात आहे. त्यामुळे संवाद मीडिया देखील राज्यातच नव्हे तर राज्याबाहेर व देश-विदेशात पोचत आहे.
साहित्यिकांनी जरूर आपले दर्जेदार साहित्य संवाद मिडियाकडे पाठवावे, संवादच्या माध्यमातून ते नक्कीच प्रसिद्धीस दिले जाईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + ten =