सीईओंं देवानंद ढेकळेची चौकशी सुरू

सीईओंं देवानंद ढेकळेची चौकशी सुरू

कुडाळ नगरपंचायतीच्या तत्कालीन सीईओंं देवानंद ढेकळेची चौकशी सुरू

कुडाळ प्रतिनिधी :-

अखेर कुडाळ नगरपंचायतीचे तत्कालीन सीईओ देवानंद ढेकळे यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. कुडाळ नगरपंचायतचे तत्कालीन मुख्याधिकारी देवानंद ठेकळे यांना तीन अपत्य झाल्याबद्दल व नगरपंचायत पदाचा गैरवापर केल्याबद्दल कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीची दखल घेत नगरविकास मंत्री यांनी कडक चौकशीचे आदेश दिले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काॅग्रेस जिल्हाध्यक्ष अमीत सामंत यांनी मोलाच सहकार्य केले असल्याची माहिती ओंकार तेली यांनी दिली आहे. नगरविकास मंत्री, नगरविकास राज्यमंत्री, अमीत सामंत यांचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा