युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण चेकपोस्ट येथील कर्मचाऱ्यांना फेसवायझर व मास्कचे वाटप

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण चेकपोस्ट येथील कर्मचाऱ्यांना फेसवायझर व मास्कचे वाटप

तळेरे

युवा सेनाप्रमुुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण चेकपोष्ट येथे कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस, महसुल आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सक्तार करीत त्यांचे कोराना संसर्गापासून बचाव होण्यासाठी सेनेतर्फे फेसवायझर, मास्क वाटप करण्यात आले.याशिवाय खरेपाटण येथील शेठ नविचंद्र मफतलाल विद्यालयामध्ये वृक्षारोपण करुन हा वाढदिवस मोठ्या सामाजिक उत्साहात साजरा केला.


यावेळी उपस्थित युवा सेना जिल्हाप्रमुख गितेश कडु, शिवसेना विभागप्रमुख महेश ऊर्फ गोट्या कोळसुलकर, युवा सेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, युवा सेना विभागप्रमुख तेजस राऊत,शाखाप्रमुख शिवाजी राऊत, संतोष गाठे, गिरीष पाटणकर, सुजय पाटणकर, भुषण कोळसुलकर, आदीनाथ शेट्ये, गौरव १ोलार आदि युवा सैनिक उपस्थित होते

 

वनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेतर्फे आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवर

प्रतिक्रिया व्यक्त करा