You are currently viewing दिपक केसरकर यांच्या “वेंगुर्ले शिवसेना” संपर्क कार्यालयाचे १ ऑक्टोबरला उद्घाटन…

दिपक केसरकर यांच्या “वेंगुर्ले शिवसेना” संपर्क कार्यालयाचे १ ऑक्टोबरला उद्घाटन…

वेंगुर्ले

राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या वेंगुर्ले येथील शिवसेना संपर्क कार्यालयचा उद्घाटन सोहळा शनिवार १ ऑक्टोबरला दु. १२.३० वा. आयोजित करण्यात आला आहे. येथील सप्तसागर बिल्डिंगमध्ये श्री. केसरकर व माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी माजी पं. स. सभापती, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, सरपंच, नगरसेवक, ग्रा. पं. सदस्य, सर्व पदाधिकारी व शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर आणि वेंगुर्ला शहरप्रमुख सचिन वालावलकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा