You are currently viewing केंद्राने हजारो कोटी रुपये खर्च करून देखील देश कोविड मुक्त झाला नाही..

केंद्राने हजारो कोटी रुपये खर्च करून देखील देश कोविड मुक्त झाला नाही..

रणजित देसाई याचा जाब पंतप्रधानांना विचारणार का? – अतुल बंगे

 

सिंधुदूर्ग :

देशात कोविड१९  आजार पसरल्यानंतर कोविड उपाययोजनांसाठी  केंद्र सरकराने  हजारो कोटी रुपये खर्च केले असे असताना देश कोविड  मुक्त होणे गरजेचे होते. मात्र हजारो कोटी रुपये खर्च करून देखील प्रत्यक्षात मात्र आपला देश कोविड मुक्त झाला नाही उलट देशात कोरोनाची दुसरी लाट आली. हे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अपयश आहे. मग याचा जाब  रणजित देसाई पंतप्रधानांना विचारणार का? असा सवाल संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष, शिवसेनेचे अतुल बंगे यांनी उपस्थित केला आहे.

अतुल बंगे पुढे म्हणाले, रणजित देसाई हे संकट काळात लपून बसणारे नेते आहेत. कोविड काळात  केल्या जाणाऱ्या उपाययोजनांसाठी  तसूभर  योगदान देसाई यांनी दिलेले नाही. लोकांच्या सुखदुःखात कधी सामील झालेले पाहिले नाही कि ऐकलेही नाही. केवळ राणे फॅमिलीला खुश करण्यासाठीच देसाई आपले आयुष्य वेचू घालत आहेत. त्यादृष्टीनेच त्यांची खटपट सुरु असते.

जनता संकटात असताना कधीही न उगवणारे रणजित देसाई यांनी आज अचानक बाहेर येऊन थेट जिल्हा आरोग्य यंत्रणा, प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर आरोप केलेत.त्यांना मी सांगू इच्छितो कि,  सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड  रुग्ण संख्या वाढण्यास  केंद्र सरकारच जबाबदार आहे. देशातील जनतेला वाऱ्यावर सोडून कोविड लस इतर देशांना पाठवून  पंतप्रधानांनी  आपली पाठ थोपटून  घेतली. ज्यावेळी देशात रुग्णसंख्या वाढत होती, ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी होत होती तेव्हा  पंतप्रधान प. बंगालच्या निवडणुकांमध्ये व्यस्त होते. जर देशात वेळेवर  कोविड लसीकरण झाले असते ऑक्सिजन पुरवठ्याची उपाययोजना झाली असती तर आज देशातील  हजारो रुग्ण वाचले असते सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोन मध्ये गेला नसता.

भाजपच्या सर्व नेते मंडळींनी राज्य सरकार कडे मदत करण्याऐवजी पीएम केअर फंडात निधीची मदत केली. मात्र या निधीचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला किती फायदा झाला हे देखील देसाई यांनी जाहीर करावे. भाजप आमदारांच्या फंडातून राणेंच्या पडवे  हॉस्पीटल येथे उभारलेल्या कोविड आरटीपीसीआर लॅब मधून किती लोकांची टेस्ट मोफत करण्यात आली. याची माहिती देखील रणजित देसाई यांनी जनतेसमोर आणणे गरजेचे आहे. आता राणेंना खुश करण्यासाठीचे तुमचे सुरु असलेले धंदे बंद करा आणि प्रत्यक्षात लोकांना मदतीसाठी  मैदानात उतरा मगच टीका करा.असा समाचार अतुल बंगे यांनी घेतला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =