You are currently viewing मनसे चा आंदोलनाचा इशारा. . .

मनसे चा आंदोलनाचा इशारा. . .

मा. वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी ला मनसे कडून निवेदन.

शेर्ले covid-19 सेंटर मध्ये जो साफसफाई ठेका दिला तो तात्काळ रद्द करा तसेच त्या ठिकाणी अति जोखमीचे काम करणाऱ्यांना पी.पी. ई. किट देण्याची मागणी.

सावंतवाडी / प्रतिनिधी :-

उपरोक्त विषयान्वये आम्ही आपणास सांगू इच्छितो काही दिवसांपूर्वी शेर्ले येथील कोविंड सेंटरमध्ये साफसफाई तसेच दुर्गंधी आधी तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आत्ताच उपचार घेत असलेल्या रुग्णांकडून तक्रारी येत होत्या तसेच आम्ही आपणास उपजिल्हा रुग्णालयात घेराव घातला होता.

त्यानंतर दिनांक 29 ऑगस्ट रोजी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी त्या covid-19 सेंटरची पाहणी केली असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा होता त्याची छायाचित्र ही आम्ही प्रसारमाध्यमांना दिली त्याठिकाणी सुरक्षेतेची कुठचीही काळजी घेतली जात नाही उपचार घेणाऱ्या रुग्णांची ही तीच तक्रार आहे या सर्वांचा विचार करता सदर दिलेल्या साफसफाईचा ठेका तात्काळ रद्द करण्यात यावा तसेच त्यांनी साफसफाई केली नसल्यामुळे जी अनामत रक्कम आहे ती जप्त करण्यात यावी.

तसेच त्या ठिकाणी नियमित साफसफाई होईल अशा ठेकेदारांना तो ठेका देण्यात यावा ही विनंती सदर गोष्टीवर तात्काळ विचार करून तो ठेका रद्द करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपल्या कार्यालययावर 7/ 9/ 2020 रोजी आंदोलन छेडण्यात येईल व त्यास संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. यावेळी निवेदन सादर करताना माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे शहराध्यक्ष आशिष सुभेदार उपशहर अध्यक्ष शुभम सावंत देवेंद्र कदम विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष ओमकार कुडतरकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × three =