You are currently viewing ठाकरे शिवसेनेच्या पेंडूर जिल्हा परिषद विभाग प्रमुख पदी भिवा तळगावकर

ठाकरे शिवसेनेच्या पेंडूर जिल्हा परिषद विभाग प्रमुख पदी भिवा तळगावकर

कुडाळ 

ठाकरे शिवसेनेच्या पेंडूर जिल्हा परिषद विभाग प्रमुखपदी भिवा तळगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड मालवण उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज यांनी जाहीर केली.

जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने विभाग प्रमुखांची नियुक्ती केली जात आहे. त्यानुसार पेंडुर जिल्हा परिषद मागास सेल विभाग प्रमुखपदी श्री. तळगावकर यांची नियुक्ती करून आज उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज यांनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी महिला तालुकाप्रमुख सौ. श्वेता सावंत, विभाग प्रमुख कमलाकर गावडे, उपविभाग प्रमुख प्रदिप सावंत, अण्णा गुराम, रवींद्र साळकर, लता खोत, संतोष कदम, शिशुपाल राणे, बाबू टेंबुलकर, विनोद सावंत, वंदेश ढोलम, संदिप सावंत, विष्णू लाड, किशोर भगत वगैरे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित पेंडूर जिल्हा परिषद मागास सेल विभाग प्रमुख भिवा तळगावकर यांनी आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वाढीसाठी आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांच्या साथीने प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा