You are currently viewing वैभववाडी तालुक्यात ७० जागांसाठी १४६ उमदेवार रिंगणात

वैभववाडी तालुक्यात ७० जागांसाठी १४६ उमदेवार रिंगणात

वैभववाडी

तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीसाठी वैध ठरलेल्या १३४ अर्जापैकी सोमवारी ५४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे १२ ग्रामपंचायतीतील ३३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर ७० जागांसाठी १४६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मांगवली ग्रामपंचायत याअगोदरच बिनविरोध झाली आहे. तर वेंगसर ग्रामपंचायतीच्या सहा जागा बिनविरोध झाल्या असून एका जागेसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून प्रमुख पक्ष असलेल्या भाजप शिवसेनेत खरी लढत होणार आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर ग्रामपंचायत निहाय स्थिती खालीलप्रमाणे आहे. कुंभवडे १ जागा बिनविरोध आली असून ६ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर ६ जणांनी माघार घेतली आहे. लोरे येथे ९ जागांसाठी १९ उमेदवार असून १ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. वेंगसर ग्रामपंचायतीत एका जागेसाठी २ उमेदवार असून एका उमेदवारांनी माघार घेतली असून ६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. आचिर्णे येथे ९ जागांसाठी २० उमेदवार लढत आहेत. याठिकाणी कोणीही माघार घेतली नाही. भुईबावडा ग्रामपंचायतीमध्ये ५ जागांसाठी १० उमेदवारी अर्ज असून ६ जणांनी माघार घेतली आहे. कोकिसरे ग्रामपंचायतीमध्ये ३ जागा बिनविरोध झाली असून ८ जागांसाठी २० उमेदवारी अर्ज आहेत. तर ९ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. सांगुळवाडी ग्रामपंचायतीमध्ये पाच जागा बिनविरोध निवडून आल्या असून २ ठिकाणी लढत होत आहे. याठिकाणी ३ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. नाधावडे ग्रामपंचायतीमध्ये ४ जागा बिनविरोध झाल्या असून ५ जागांसाठी १० उमेदवार लढत आहेत. याठिकाणी २ जणांनी माघार घेतली आहे. ऐनारी ग्रामपंचायतीमध्ये मध्ये ३ जागांसाठी ६ उमेदवार असून एका उमेदवाराने माघार घेतली आहे. तर ४ जण बिनविरोध निवडून आले आहेत. सोनाळी ग्रामपंचायतींमध्ये ७ जागांसाठी १५ उमेदवार लढत आहे. तर ४ जणांनी माघार घेतली आहे. खांबाळे मध्ये ९ जागांसाठी १८ उमेदवार असून १२ जणांनी माघार घेतली आहे. एडगाव ग्रामपंचायतीमध्ये एक जागा बिनविरोध निवड झाली असुन सहा जागांसाठी 11 उमेदवार लढत आहे. तर १० जणांनी माघार घेतली आहे . सोमवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूकीचे खरे चिञ स्पष्ट झाले असून शिवसेना व भाजप ग्रामपंचायतीवर आपलाच झेंडा फडकविणारच असा दावा करीत आहेत. त्यामुळे या दोन पक्षांची या निवडणूकीत प्रतिष्ठापणाला लागली आहे. तालुक्यातील शिवसेना भाजपच्या मोठ्या पदाधिका-यांच्या गावात निवडणूका होत असून आपले वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. त्यामुळे तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीवर कोणता पक्ष कोणती ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेण्यात यशस्वी होतो. हे पहाणे म्हत्वाचे ठरणार असून संपूर्णपणे तालुक्याचे या निवडणूकांकडे लक्ष लागून राहीले आहे. तर मांगवली ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून भाजपने या ग्रामपंचायतीवर दावा केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =