You are currently viewing कुंभारमाठ पॉलिटेक्निक मार्गावर कारला धडक बसल्याने रिक्षा पलटी होउन घडला अपघात 

कुंभारमाठ पॉलिटेक्निक मार्गावर कारला धडक बसल्याने रिक्षा पलटी होउन घडला अपघात 

मालवण

कुंभारमाठ पॉलिटेक्निक मार्गावर उभ्या असलेल्या कारला रिक्षाची धडक बसल्याने रिक्षा पलटी झाल्याने शुक्रवारी रात्री अपघात घडला. या अपघातात रिक्षा चालक व प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मालवण शहरातील भरड येथील रिक्षा व्यावसायिक दीपक माणगांवकर हे शुक्रवारी रात्री प्रवाश्यांना घेऊन कुंभारमाठ पॉलिटेक्निक मार्गावर जात असताना रस्ता बाजूला उभ्या असलेल्या कारमधील एका प्रवाश्यांने कारचा दरवाजा उघडल्याने माणगांवकर यांच्या रिक्षाची धडक कारच्या दरवाजावर बसून रिक्षा पलटी झाली. यात चालक दीपक माणगांवकर व प्रवासी जखमी झाले. त्यांना स्थानिकांनी व रिक्षा व्यवसायिक यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दीपक माणगांवकर यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी भरड येथील रिक्षा व्यावसायिक व अन्य उपस्थित होते. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − thirteen =