You are currently viewing लोकमान्य बँकेच्या गणरंग चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

लोकमान्य बँकेच्या गणरंग चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

बांदा

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी यांच्या वतीने गणेशोत्सव कालावधीत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्या व सहभागी स्पर्धकांचा नुकताच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या स्पर्धेला भरभरुन प्रतिसाद मिळाला होता बांदा शाखेच्या परिसरातील विद्यार्थीही या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या सर्व विद्यार्थ्यांना सोसायटीतील अधिकारी व कर्मचारी विष्णू देसाई, ज्ञानेश्वर येडवे,अक्षय वाडकर,श्रीया पास्त यांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला बांदा परिसरातील विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा