You are currently viewing सिंधुदुर्गच्या तायक्वांदोटूंनी ४ सुवर्ण, १ रौप्य, १० कांस्य पदकांची केली कमाई…

सिंधुदुर्गच्या तायक्वांदोटूंनी ४ सुवर्ण, १ रौप्य, १० कांस्य पदकांची केली कमाई…

सिंधुदुर्गच्या तायक्वांदोटूंनी ४ सुवर्ण, १ रौप्य, १० कांस्य पदकांची केली कमाई…

रत्नागिरी येथे राज्यस्तरीय तायक्‍वांदो स्पर्धा;७०० स्पर्धकांनी घेतला होता सहभाग..

कणकवली

रत्नागिरी तेथे झालेल्या खुल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तायक्वांदो पटूंनी विविध वजनी गटात चार सुवर्ण, एक रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली.
रत्‍नागिरी तायक्‍वांदो आणि राज्‍य तायक्‍वांदो असोसिएशन यांच्या संयुुक्‍तपणे एमआयडीसी मिरजोळे येथे ही स्पर्धा झाली. यात राज्‍यातील ७०० स्पर्धकांनी घेतला होता सहभाग. या स्पर्धेत स्विझल डिसुझा, स्पृहा राणे, देवश्री कणसे आणि दुर्वा पवार यांनी सुवर्णपदक पटकावले. तर साईराज पाटील याने रौप्य पदक पटकावले. तर कास्यपदक मिळविलेल्‍या खेळाडूंमध्ये गणराज शिरवलकर, मंजिरी सावंत, अवनी घाडीगावकर, अस्मी राऊळ, श्रेयस पुजारे, ऋणमय शिरवलकर, रुतुजा शिरवलकर (कांस्यपदक), दुर्वा गावडे, रुजुता कुंभार, साईराज सावंत यांचा समावेश आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे सचिव भालचंद्र कुलकर्णी, कणकवली तालुका हौशी तायक्वांदो असोसिएशनचे सचिव एकनाथ धनवटे, प्रशिक्षक मंदार परब, अविराज खांडेकर, दिक्षा पारकर,पंच अंकुर जाधव, जान्हवी बाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा