You are currently viewing मालवणात छत्रपती चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन

मालवणात छत्रपती चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन

मालवण

भारतीय जनता युवा मोर्चा मालवण पुरस्कृत व महापुरुष रेवतळे कबड्डी संघ यांच्यावतीने आयोजित शिवजयंती निमित्त मॅटवरील निमंत्रित संघांसाठी छत्रपती चषक २०२२ जिल्हास्तरीय डे-नाईट कबड्डी स्पर्धा दि. १९ फेब्रुवारी रोजी मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानावर होणार आहे.

या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रोख रुपये पंधरा हजार व चषक, द्वितीय पारितोषिक दहा हजार व चषक तसेच तृतीय व चतुर्थ पारितोषिक पाच हजार व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच अष्टपैलू खेळाडू १५०० रुपये व चषक, उत्कृष्ट चढाई १००० रुपये व चषक, उत्कृष्ट पकड १००० रुपये व चषक देण्यात येणार आहे. कोरोनाचे अटी नियम पाळून स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. तरी कबड्डी प्रेमींनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा