You are currently viewing तब्बल तीस वर्षानंतर येथे निवडणूक आखाडा रंगणार…

तब्बल तीस वर्षानंतर येथे निवडणूक आखाडा रंगणार…

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी तालुका पारनेर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. तेथे दोन जागा बिनविरोध निवडून आल्या असल्या तरी इतर सात जागांसाठी निवडणूक होत आहे. गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी हजारे यांनी अनेकदा प्रयत्न केले. त्यास यश मिळाल्याने महाराष्ट्रातील अनेक गावांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. राळेगणसिद्धी येथे यापूर्वी अनेक वर्ष बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीची परंपरा होती. मात्र मागील वर्षी निवडणूक झाली. या वर्षी नऊ पैकी दोनच बिनविरोध होऊ शकल्या.

आदर्श गाव हिवरे बाजार ग्रामपंचायतीसाठी 30 वर्षानंतर निवडणूक होत आहे. यापूर्वी राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या पूर्वी येथे बिनविरोध निवडणूक होत होती. तथापि या वर्षी त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले. त्यामुळे तब्बल तीस वर्षानंतर येथे निवडणूक आखाडा रंगणार आहे. 1990 पासून हिवरेबाजार ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होत होती. मागील तीस वर्षापासून दरवर्षी 31 डिसेंबरला गावाच्या विकासाचा आराखडा मांडून हिशेब दिला जात होता. त्यामुळे गाव कारभाराबाबत कुणाची तक्रार नव्हती. पहिल्यांदाच व्यक्तिगत कारणातून गावाला निवडणुकीला सामोरे जावे लागत आहेत. या गावात सात जागांसाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान या ग्रामपंचायतीने देशापुढे अनेक आदर्श ठेवले. आदर्श गावासाठी दिली जाणारी अनेक बक्षिसे मिळवली. गावातील एकोपा जलसंधारण वृक्ष संवर्धनाबाबत देशातील ग्रामपंचायती पुढे हे गाव आदर्श ठरले.

याबाबत पोपटराव पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र असते. सर्वांनी मिळून ज्याप्रमाणे गाव उभे केले. त्याच पद्धतीने निवडणूक व्हावी गैरमार्गाचा वापर होऊ नये. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही ग्रामस्थांनी प्रयत्न केले. परंतु काहीही ऐकले नाही पवार हे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समिती महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 10 =