You are currently viewing कळसुलकर हायस्कूलमध्ये ६ सप्टेंबर रोजी शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्राचे आयोजन

कळसुलकर हायस्कूलमध्ये ६ सप्टेंबर रोजी शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्राचे आयोजन

सावंतवाडी

शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती करुन देण्यासाठी, त्या संदर्भात प्रबोधन करण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कूल मध्ये ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता तिमिरातून तेजाकडे हे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे.

भारत सरकारच्या मुंबई सीमा शुल्क विभागात कार्यरत असणारे सिंधुदुर्गचे सुपुत्र सत्यवान रेडकर हे यावेळी उपक्रमातून विद्यार्थ्यांना निःशुल्क मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन सत्राचा विद्यार्थी, पालकांनी आणि शिक्षकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 4 =