You are currently viewing कवी-गझलकार जयराम धोंगडे यांना यावर्षीचा ‘सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार’ जाहीर

कवी-गझलकार जयराम धोंगडे यांना यावर्षीचा ‘सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार’ जाहीर

*कवी-गझलकार जयराम धोंगडे यांना यावर्षीचा ‘सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार’ जाहीर*

उमरखेड: दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पुरोगामी युवा ब्रिगेड, उमरखेडचा तृतीय वर्धापन दिन, संविधान दिवस आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून स्व. भाऊसाहेब माने गौरव कृती समितीच्या वतीने दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांचा विविध पुरस्कार देऊन यथोचित गौरव केला जाणार आहे.


लोकनेते, शिक्षण महर्षी आणि सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते स्व.भाऊसाहेब माने हे उमरखेड तालुक्याचे भूषण होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे त्यांनी परिसरात लावलेले रोपटे आज विशाल वृक्षात रुपांतरीत झाले असून या संस्थेतून बाहेर पडलेले असंख्य विद्यार्थी आपल्या कर्तृत्वाने सर्वदूर नावलौकिकास पात्र ठरले आहेत. भूमिपुत्रांचा गौरव व्हावा या उद्देशाने आरोग्य, शिक्षण, प्रशासन, कृषी, महिला सक्षमीकरण, साहित्य, पत्रकारिता अशा वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था अथवा व्यक्ती यांना दरवर्षी पुरस्कार दिला जातो.


जेष्ठ कवी, गझलकार जयराम धोंगडे हे चातारी, ता. उमरखेडचे भूमिपुत्र आहेत. ‘शब्दाटकी’, ‘कोरोनायण’, ‘जय बोले’ हे त्यांचे गझल आणि काव्यसंग्रह प्रकाशित असून त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांची यावर्षीच्या ‘भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार’ साठी निवड करण्यात आली आहे. पुरोगामी युवा ब्रिगेडचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष शिवशंकर सुरोशे, सचिव सागर शेरे यांच्या स्वाक्षरीचे पत्र उमरखेड तालुकाध्यक्ष शाहरुख पठाण यांनी त्यांना पत्र पाठवून निवडीबद्दल कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 11 =