You are currently viewing चिपी विमानतळाची उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करा – खा. विनायक राऊत

चिपी विमानतळाची उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करा – खा. विनायक राऊत

चिपी विमानतळ प्रकल्पाचा खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांनी घेतला आढावा

चिपी विमानतळ उदघाटनाच्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी सायंकाळी चिपी विमानतळ प्रकल्पाला भेट देत आढावा घेतला.एटीएस टॉवरची तसेच विमानतळाच्या यंत्रणेची पाहणी केली. आवश्यक सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.


कोणत्याही परिस्थितीत २० जानेवारी २०२१ रोजी चिपी विमानतळ प्रकल्प सुरू करण्याचे टार्गेट आहे.४ जानेवारीला अलायन्स कंपनीचे पथक याठिकाणी येणार आहे. त्यामुळे येत्या २० जानेवारीपर्यंत या प्रकल्पाला डीजीसीएची परवानगी मिळालीच पाहिजे.त्यादृष्टीने महावितरण व बीएसएनएल विभागाने किरकोळ कामे पुर्ण करून घ्यावीत, अशा सक्त सूचना खा.विनायक राऊत यांनी उपस्थितीत अधिकाऱ्यांना दिल्या.

पहीले येणारे विमान अलायन्स कंपनीचे ७० सीटचे असेल.आम्हाला उद्घाटनापेक्षा ऑपरेशन सुरू होणे महत्त्वाचे आहे, असे खा.विनायक राऊत यांनी सांगितले. चिपी विमानतळ प्रकल्पाला आवश्यक असणारा पाणी पुरवठा कुडाळ येथील बंधाऱ्यातून केला जाईल. येत्या आठवड्यात पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू होऊन लवकरच पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहेत असे खा.राऊत यांनी सांगितले.
पिंगुळी- पाट ते चिपीकडे येणारा रस्ता सुस्थितीत होणे गरजेचे आहे. याकडे लक्ष वेधताच खा.राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून काम हाती घेण्याबाबत सूचना केल्या.यावेळी आयआरबीचे प्रकल्प अधिकारी राजेश लोणकर, यांनी विमानतळ प्रकल्पाची पुर्ण झालेली यंत्रणा दाखवित आम्ही पुर्ण क्षमतेने सज्ज असल्याचे सांगितले.


यावेळी जि.प.सदस्य सुनील म्हापणकर, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शैलेश परब, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, सचिन देसाई, गणेश तारी, विजय घोलेकर, वीज वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता लोकरे, बीएसएनएल विभागाचे देशमुख तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 4 =