You are currently viewing आयुष्य

आयुष्य

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री सुजाता पुरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आयुष्य*

 

आस उरली ना कशाची

समाधानी मी असे अंतरी

जीवन आहे नाव ज्याचे..

वेगवेगळ्या वाटांची मुशाफिरी..

 

कधी सुमने अशी भेटती

शीन अवघा करती हलका..

कधी काटे करती घायाळ

वेदनांचा मग किती गलका..

 

क्षण कधीतरी असे मिळतात

आयुष्य अवघे बदलून टाकतात..

एक घटना अशी घडते जणू

अश्रूंनी ह्रदये निशब्द होतात…

 

 

कधी तप्तता,कधी शीतलता

किती उन्हाळे,किती हिवाळे

आयुष्यावर बेतलेले सगळे ऋतू

अंतरंगी भावनांचे किती पावसाळे

 

साहून अवघे अनुभव आता

मन होत असे पोक्त..

गुंतने नको कशात आता

शांततेचे मन होय भक्त..

 

सुजाता पुरी

अहमदनगर

8421426337

प्रतिक्रिया व्यक्त करा