You are currently viewing दोडामार्ग भेडशी वरचा बाजार येथे खून

दोडामार्ग भेडशी वरचा बाजार येथे खून

दोडामार्ग साटेली भेडशी बाजारपेठेत डोक्यात लाकडी फळी मारून खून

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी बाजारपेठेत मंगळवारी अज्ञात व्यक्तीनं सुमारे 50 वर्षीय अमर मनोहर देशमाने (रा. कोयनानगर, सातारा) याचे डोकीत लाकडी फळी मारून खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोडामार्ग पोलीस जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कसून तपास करत असून एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

या खुनाची माहिती आवाडे गावचे पोलीस पाटील प्रकाश महादेव देसाई यांनी दिली. त्यानुसार अज्ञाता विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साटेली भेडशी येथील वामन संकुल या इमारतीच्या मधल्या पॅसेजमध्ये हा प्रकार 21 मे रात्री साडे नऊ ते 22 मे रोजी सकाळी 07.00 चे मुदतीत घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी भादवी कलम 302 नुसार अज्ञाता विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस निरिक्षक निसर्ग ओतारी पुढील तपास करत आहेत.

दरम्यान खूनाचा गुन्हा साटेली – भेडशी येथे घडल्याची माहिती मिळतात जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रावल कृषिकेश यांसह, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी घटनस्थळाला भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांची फॉरेन्सिक टीम ही घटनास्थळी दाखल होत आवश्यक नमुने व पुरावे ताब्यात घेतले आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा