You are currently viewing जिल्हा शल्य चिकित्सक पदी डॉ. नागरगोजे हजर

जिल्हा शल्य चिकित्सक पदी डॉ. नागरगोजे हजर

ओरोस

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा कारभार डॉ बाळासाहेब नागरगोजे मंगळवारी सायंकाळी स्वीकारला. डॉ धनंजय चाकूरकर यांची बदली झाल्यानंतर सुमारे दीड वर्ष हा कारभार प्रभारी म्हणून डॉ श्रीपाद पाटील सांभाळत होते. डॉ नागरगोजे यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा रुग्णालयाला कायमस्वरूपी जिल्हा शल्य चिकित्सक उपलब्ध झाले आहेत.


दरम्यान, २ दिवसापुर्वी रिक्त असलेल्या या जागेवर डॉ अशोक नांदापुरकर हजर झाले होते. परंतु शासनाने नांदापूरकर यांना बढती दिली असून त्यांना पुणे येथे आरोग्य उपसंचालक म्हणून नियुक्ती दिली आहे. दरम्यान, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डाँ श्रीपाद पाटील यांनी कोरोना काळापासून गेली दिड वर्ष या पदाचा कार्यभार सांभाळत चांगली रुग्णसेवा दिली होती.
येथील जिल्हा शल्य चिकित्सक पदाच्या नियुक्तीची संगीत खुर्ची गेला आठवडाभर सुरु होती. त्याला शासनाने पुर्णवीराम दिला आहे. जिल्हा रुग्णालय त्यातच वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे यामुळे रुग्णालय सेवेवर त्याचा परिणाम होत होता. शासनाने डाँ नागरगोजे यांची पहिली नियुक्ती दिली होती. त्याला पुन्हा स्थगिती देत या पदावर डाँ नांदापुरकर यांना नियुक्ती दिली. ते दोन दिवसापुर्वी हजरही झाले. मात्र कोल्हापुर आरोग्य उपसंचालकानी या पदावरून कार्यमुक्त करावे असे आदेश काढले. त्यामुसार त्यांनी या पदाचा कार्यभार सोडला. डाँ नागरगोजे यांनी मंगळवारी सायंकाळी या पदाचा कार्यभार स्विकारला. डॉ नागरगोजे यापूर्वी परभणी येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत होते त्यांनी २२ वर्षे आरोग्य विभागात सेवा केली आहे. प्रथमच या जिल्हात आपण आलो असून या जिल्हात चांगले काम करु असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा