You are currently viewing कुडाळ येथील साईलने पटकावला उत्कृष्ट सहाय्यक बाल कलाकार पुरस्कार…

कुडाळ येथील साईलने पटकावला उत्कृष्ट सहाय्यक बाल कलाकार पुरस्कार…

मुंबई एंटरटेनमेंट इंटरनॅशनल फिल्मचा पटकावला पुरस्कार; माली शॉर्टफिल्म मध्ये केली भूमिका

कुडाळ

स्नेहांश एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि शेखर गवस दिग्दर्शित ‘माली’ या शॉर्टफिल्म मधील कलाकार आणि कुडाळ येथील पिंगुळी चा रहिवासी कुमार साईल महेंद्र सातार्डेकर याला मुंबई एंटरटेनमेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये उत्कृष्ट सहाय्यक बाल कलाकार म्हणून गौरविण्यात आले आहे.

कणकवली येथील शेखर गवस यांनी दिग्दर्शित केलेली आणि रामचंद्र कुबल यांनी लिहिलेली माली या शॉर्टफिल्म मध्ये साईल सातार्डेकर याने या शॉर्टफिल्म मध्ये मुख्य भूमिका करणाऱ्या दिव्या धामणेकर यांच्या भावाची भूमिका अगदी उत्तम रित्या साकारली आहे. साईल हा कुडाळ येथील एम आय डी सी बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल मध्ये इयत्ता ४ थी मध्ये शिक्षण घेत आहे. त्याने मिळवलेल्या या यशात त्याच्या आई वडिलांसह त्याच्या संपूर्ण टीमचे मौलाचे योगदान असून, सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा