You are currently viewing महाराष्ट्र क्रांती संघटनेचे मुख्य सल्लागार पदी कामगार व धनगर नेते सिताराम बोडके

महाराष्ट्र क्रांती संघटनेचे मुख्य सल्लागार पदी कामगार व धनगर नेते सिताराम बोडके

वैभववाडी:

महाराष्ट्र क्रांती संघटनेच्या मुख्य सल्लागार पदी कामगार व धनगर समाज नेते सिताराम उर्फे बापू बोडके यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र क्रांती संघटना ही धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी अविरत लढणारी संघटना आहे. स्व. बी. के. कोकरे बापूसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र क्रांती संघटना प्रमुख पी. बी. दादा कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागिल कित्येक वर्षे समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत असताना तळकोकणात आपला विस्तार वाढवत आहे. समाजातील गोरगरीब बांधवांच्या मदतीला धावत आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवत रान पेटवत संघटनेची घोडदौड होत आहे. मुख्य सल्लागार पदी सिताराम बोडके निवड करण्यात आली आहे. त्यांचे विविध संघटनेकडून समाजाकडून लोकप्रतिनिधी कडून अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =