You are currently viewing संकटकाळात धावून जाणारा नेता; तहसीलदार राजाराम म्हात्रे

संकटकाळात धावून जाणारा नेता; तहसीलदार राजाराम म्हात्रे

राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा ४१ वा वाढदिवस आज त्यांच्या निवासस्थानी पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत थाटात साजरा करण्यात आला. संकटकाळात धावून जाणारा कार्यकर्ता अशी ओळख असणाऱ्या पुंडलिक दळवी यांच्या वाढदिवसाला सावंतवाडी सह दोडामार्ग, वेंगुर्ला आदी शहरातील कार्यकर्ते देखील मोठ्या उत्साहाने आले होते. कोविड संकट असो वा चक्रीवादळ, महापूर पुंडलिक दळवी अगदी गावागावात पोचले होते, त्यामुळे त्यांच्या प्रति असलेल्या आत्मीयतेपोटी अनेकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.

पुंडलिक दळवी यांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी असलेले चांगले संबंध आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या पदाधिकारी व नेत्यांवरून दिसून आले. शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा आनारोजीन लोबो, राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी या देखील आवर्जून उपस्थित होत्या. राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल परुळेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदींनी व्यासपीठावर उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या.

पुंडलिक दळवी यांना शुभेच्छा देताना तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी पुंडलिक दळवी यांना शुभेच्छा देताना आपल्या छोटेखानी भाषणात आपले जवळचे मित्र म्हणून त्यांचा गौरव केला आहे, तसेच कोरोना काळात संपूर्ण तालुका फिरताना पुंडलिक दळवी यांनी मोलाची मदत केल्याचेही आवर्जून सांगितले. माडखोल धरणाच्या विषयावर भाजपाचे राजन तेली, सेनेचे रुपेश राऊळ व पुंडलिक दळवी हे राजकारण न करता जनतेच्या विषयावर एकत्र येत जनतेसाठी लढत होते हे नक्कीच जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदाच पहायला मिळालं असा संकटकाळात धावून जाणारा एक चांगला माणूस म्हणून म्हात्रे यांनी पुंडलिक दळवींचा उल्लेख केला.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल केसरकर यांनी पुंडलिक दळवी यांनी काहीच वर्षात उभं केलेलं वैभव पाहून त्यांचे विशेष कौतुक केले. संघटना उभी करणे सोपे नसते, त्यात कार्यकर्ते सांभाळावे लागतात, आजकाल कार्यकर्ते सकाळी एकासोबत तर सांजचे दुसर्यासोबत जातात असे सांगत नव्या राजकारणाची फिरकी घेतली व पुंडलिक दळवींना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पुंडलिक दळवींच्या वाढदिवसानिमित्त शहरातील रिक्षा चालकांना मोफत पेट्रोल, रुग्णालयात फळवाटप, व इतर समाजोपयोगी उपक्रम राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतले.

पुंडलिक दळवी हे गरिबीतून उभं राहिलेलं नेतृत्व असल्याने केवळ राजकारण आणि लोकप्रियतेसाठी कार्य करत नसून समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने काम करतात. त्यामुळे आज त्यांच्या वाढदिवसाला सर्वसामान्य लोकही आवर्जून उपस्थित राहिले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 9 =