You are currently viewing राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ आणि श्रावस्ती सामजिक, शैक्षणीक, संशोधन प्रतिष्ठान परळी वैजनाथ जिल्हा बीड आयोजीत पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ आणि श्रावस्ती सामजिक, शैक्षणीक, संशोधन प्रतिष्ठान परळी वैजनाथ जिल्हा बीड आयोजीत पुरस्कार जाहीर

नाशिक :

 

६ व्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष श्री. संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण महाराष्ट्रातून सामजिक, शैक्षणीक, साहित्यिक, आरोग्य, सांस्कृतिक पत्रकारिता, क्रिडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मिळणाऱ्या पुरस्काराची घोषणा नुकतीच नाशिक येथील सटाणा येथे करण्यात आली. ज्यात मुख्यत्वे करुन मराठी साहित्य मंडळ विदर्भ विभाग प्रदेशाध्यक्ष श्री सिद्धार्थ गजानन कुलकर्णी यांना त्यांच्या क्रिडा, कला, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल ” राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकारिता जनजागृती कार्य गौरव पुरस्कार २०२३ ” देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यांच्या या चतुरस्त्र उल्लेखनीय कामगिरीचे सर्व क्षेत्रातून कौतुक करण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्यात परळी वैजनाथ बीड येथे होणाऱ्या भव्यदिव्य सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − 4 =