You are currently viewing काळसे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के

काळसे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के

 

काळसे येथील स्व. सौ जयश्री वामन प्रभू कला व वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला. या कॉलेजमधून परीक्षेस प्रविष्ठ झालेले सर्व २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये कला शाखेतून १२ विद्यार्थी व वाणिज्य शाखेतून १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या कॉलेजमधून कला शाखेतून प्रथम छाया उदय चव्हाण (३९० + ५), द्वितीय यश चंद्रकांत खोत (३७८ + ५), तृतीय वल्लभ जगदीश जोशी (३७०), वाणिज्य शाखेतून प्रथम अक्षता कृष्णा नेमळेकर (५१९ + ५), द्वितीय शिवानी सतीश ठाकुर(५१३ + ५), तृतीय साक्षी संदीप गुराम (४९९ +५) यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सीए हेमंत राजाराम परब, मुख्याध्यापक तुकाराम पेडणेकर व इतर कार्यकारणी पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा