You are currently viewing 10 वी व 12 वी परीक्षांसाठी समुपदेशांची नेमणूक

10 वी व 12 वी परीक्षांसाठी समुपदेशांची नेमणूक

सिंधुदुर्गनगरी

 मार्च / एप्रिल 2022 च्या उच्य माध्यमिक 12 वी परीक्षा दि. 4 मार्च ते 30 मार्च 2022 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( 10 वी ) परीक्षा दि. 15 मार्च 2022 ते 4 एप्रिल 2022 या दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना शंका निरसनासाठी व मार्गदर्शनासाठी श्री. एन.आर.माने, अनंत कृष्णा केळकर हायस्कूल, वाडा, ता. देवगड भ्रमणध्वनी 9420929648, 9657495281 या समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही सेवा दि. 4 एप्रिल 2022 पर्यंत सुरू राहणार आहे.

            विद्यार्थी तसेच पालक यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मंडळ अधिकारी व कर्मचारी यांची हेल्पलाईन सेवेकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळ अधिकाऱ्यांचे नाव, पदनाम व भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहे. भावना राजनोर, सहसचिव – 8806512288, एस.एल.हावळ, वरिष्ठ अधीक्षक (12 वी) तथा प्र. सहाय्यक सचिव – 9890772229, डी.पी.पोवार, वरिष्ठ अधीक्षक (10 वी) 8830384044, एन.एम.जोशी, सहाय्यक अधीक्षक (10 वी) – 9823484725, हेल्पलाईन क्रमांक – 02352-228480, 231250. तरी विद्यार्थी, पालकांना मदतीची आवश्यकता भासल्यास शंका निरसनासाठी मंडळाने सुरू केलेल्या हेल्पलाईनशी संपर्क साधण्याचे आवाहन सत्यवान सोनवणे, विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ, रत्नागिरी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा