३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

मुंबई :

अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केल्याप्रमाणे राज्यातील शेतक-यानां आता ३ लाखापर्यंत बिनव्याजि कर्ज मिळणार आहे. मान्सूनच्या दमदार आगमनाबरोबरच राज्य सरकारनेही पुर्वी   घेतलेल्या निर्णयावर शीक्कमोर्तब केले आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार असल्याची माहीती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. मंत्रीमंडळामध्ये या निर्णयावर मोहोर उमटवल्यामुळे शेतक-यानां यंदाचा खरीप हंगाम चांगला जाईल, असा आशावादही बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मंत्रीमंडळाच्या या निर्णयामुळे पीककर्जाची नियमीत परतफेड करणा-या राज्यातील शेतक-यानां ३ लाख रुपयांपर्यत पीककर्ज शुन्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खूला झाला आहे. या निर्णयासंदर्भात बोलताना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, १ ते ३ लाखापर्यंत पीककर्ज घेणा-या आणि ते नियमीत फेडनाऱ्यावर शेतक-यानां या योजनेतून हे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. यापूर्वी १ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज शेतक-यानां मिळ्त होते. तर ३ लाखापर्यंत कर्ज घेणा-या शेतक-यानां ३ टक्के व्याज भरावे लागत होते. आता ३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा