You are currently viewing बी.एस्सी नर्सिंग प्रवेशासाठी 50% परसेंटाइलची अट शिथिल करण्यासाठी उमेश गाळवणकर यांनी घेतली दिल्ली येथे आरोग्य राज्यमंत्र्यांच्या सचिवांची भेट

बी.एस्सी नर्सिंग प्रवेशासाठी 50% परसेंटाइलची अट शिथिल करण्यासाठी उमेश गाळवणकर यांनी घेतली दिल्ली येथे आरोग्य राज्यमंत्र्यांच्या सचिवांची भेट

कुडाळ:

 

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री माननीय डॉ. भारती पवार यांचे अतिरिक्त खाजगी सचिव डॉ. ओमप्रकाश शेटे यांची निर्माण भवन, दिल्ली येथील त्यांच्या दालनात भेट घेऊन बी एस्सी नर्सिंग प्रवेशाच्या संदर्भात भारतीय परिचर्या परिषदेने जाहीर केलेल्या राजपत्रांमधील 50% परसेंटाइलची अट शिथिल करण्यासाठी मा. आरोग्य राज्यमंत्री महोदयाकडून भारतीय परिचर्या परिषदेला योग्य ते निर्देश देण्यासाठी चर्चा करून निवेदन देण्यात आले. सदर निवेदनासंदर्भात भारतीय परिचर्या परिषदेला विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी सुचित करण्यात आले आहे. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उमेश गाळवणकर हे नर्सिंग महाविद्यालय चालविणाऱ्या संस्थाचालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या समस्या याबद्दल शासन स्तरावर नेहमीच सुधारणात्मक आग्रही भूमिका मांडत असतात. जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी या अभ्यासक्रमापासूं वंचित राहू नयेत. आरोग्य सेवेच्या माध्यमातूनच आरोग्य विषयक समस्याला समाज व देश समर्थपणे तोंड देऊ शकतो. याची जाणीव ठेवून ही 50 टक्के परसेंंटाईलची अट शिथिल करावे अशी सरकार दरबारी विनयपूर्वक आग्रही भूमिका घेतलेली आहे.

(सदर बैठकीत डॉ. ओमप्रकाश शेट्ये यांनी कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असे सांगितले.)

सदर निवेदन देतेवेळी बॅ नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्गचे चेअरमन श्री उमेश गाळवणकर व डॉ. व्यंकटेश भंडारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 6 =