You are currently viewing भाजपा वैद्यकीय आघाडीचे कोकण प्रभारी डाॅ.अमेय देसाई यांची वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाडा व परुळेबाजार ग्रामपंचायतीना भेट

भाजपा वैद्यकीय आघाडीचे कोकण प्रभारी डाॅ.अमेय देसाई यांची वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाडा व परुळेबाजार ग्रामपंचायतीना भेट

परुळे पंचक्रोशीत लवकरच वैद्यकीय आघाडीच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन — डाॅ.अमेय देसाई .

भाजपा वैद्यकीय आघाडीचे कोकण प्रभारी डाॅ.अमेय देसाई यांनी वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाडा व परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट दिली , यावेळी कुशेवाडा ग्रामपंचायत मध्ये सरपंच निलेश सामंत , तसेच परुळेबाजार ग्रामपंचायत मध्ये सरपंच प्रणीती आंबलपाडकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई उपस्थित होते.
यावेळी डाॅ.अमेय देसाई यांनी गावातील आरोग्य यंत्रणेबाबत चौकशी करुन केंद्र सरकार व राज्य सरकारच्या आरोग्य विषयक योजना तळागाळापर्यंत पोहचवाव्यात असे मार्गदर्शन केले . तसेच ग्रामपंचायतीच्या विवीध उपक्रमांची पहाणी करून समाधान व्यक्त केले . तसेच लवकरच वैद्यकीय आघाडीच्या वतीने परुळे पंचक्रोशीत मोफत आरोग्य शिबीर घेणार असल्याचे सांगितले .
यावेळी परुळे शक्तीकेंद्र प्रमुख रुपेश राणे व सुनील चव्हाण , कुशेवाडा उपसरपंच महादेव सापळे , दिंव्यांग आघाडीचे भरत परब , परुळे बाजार उपसरपंच राजु दूधवडकर , माजी सरपंच प्रदीप प्रभु तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 3 =