You are currently viewing नववर्षाचा आनंद लुटा पण काळजी घ्या – सिंधुदुर्ग पोलिस

नववर्षाचा आनंद लुटा पण काळजी घ्या – सिंधुदुर्ग पोलिस

नववर्षाचा आनंद लुटा पण काळजी घ्या – सिंधुदुर्ग पोलिस

अनुचित प्रकार रोखण्यासाठी अधिकार्‍यांची फौज तैनात

सिंधुदुर्गनगरी

नववर्षाच्या स्वागताचा आनंद लुटताचा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी बाळगा, असे आवाहन सिंधुदुर्ग पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच या काळात जिल्ह्यातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडणार नाही.३ पोलिस उपअधिक्षक १२ पोलिस निरिक्षक आणि ३० सहाय्यक पोलिस निरिक्षक व २०० पोलिस अमंलदारांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलिस प्रशासनाकडुन देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मद्यधुंद अवस्थेत शांतता भंग करणार्‍यांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे तर महिलांच्या सुरक्षेवर जास्तीत-जास्त लक्ष देण्यात येणार आहे. त्यामुळे आनंद लुटत असताना कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. कोणाला त्रास होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 17 =