You are currently viewing मुबारक

मुबारक

*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार, निवेदिका अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

*मुबारक*

मुबारक मुबारक

ईद मुबारक

धर्म कोणताही असो

देतो माणुसकीचा

प्रेमाचा,बंधू भावाचा संदेश

कोणताही धर्म

शिकवत नाही

भेदाभेद

स्पृश्य अस्पृश्यता

वैर, द्वेष, मत्सर

धर्म सांगतात

सच्चाईने वागा

इमानाला जागा

गरीबांना जवळ करा

मातापित्याची सेवा करा

खोटे बोलू नका

मने दुखवू नका

भांडू नका

काळा गोरा भेद मानू नका

जीवन जगा नेक

रहा सर्व एक

अनुपमा जाधव

प्रतिक्रिया व्यक्त करा