You are currently viewing मनमोहक फुलपाखरू

मनमोहक फुलपाखरू

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास म्हणजे सदस्य लेखक कवी संजय माकोणे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*मनमोहक फुलपाखरू*

निर्झराच्या त्या पुष्पवेलीतून
अवचित नजर पडली,
पुष्पगुलाबी त्या पाखराची
नजर मजला अति भावली.

निर्झरा काठी जाऊ लागलो
वाट तयाची पाहू लागलो,
शीळ तयाची कानावरी घेई
स्वप्न मनी मी रंगून जाई.

तयाची मोहक वाटे मज स्पर्श रेती
का जडली असावी माझी प्रीती,
मनी माझ्या घर करून राही
का गुंतलो मी तयाच्या ठाई.

चटक लागली असावी तयालाही
खंड न पडला त्याचाही कधी,
झेप घेई तो गगनावरी
परतून नजर फिरवी माघारी.

उतरावे तयाने खांद्यावरी
वाटत होते मजला जरी,
शब्द फुटेना मजला परी
हीच भूल ठरली खरी,हीच भूल ठरली खरी……….

संजय माकोणे,अमळनेर ता.नेवासा
9623949907

प्रतिक्रिया व्यक्त करा