You are currently viewing कर्मकांड

कर्मकांड

(मुक्तरचना)
संथ झुळझुळणारी सरिता
किनारी जलझरे वाळवंटी
विराट पिंपळवृक्ष , पारावरी
साक्षी आजही अनादीकाली…

अदृश्य भिरभिरणारे आत्मे
घुटमळती ! मुक्तीसाठी
कर्मकांडांत गुंतलेले जीव
हताश भावनिक मायापाश …

काहूर ! अंतरी गतस्मृतींचे
काकस्पर्श, पिंड, तिलांजली
सारेच , केविलवाणे प्रघात
अविरत झुळझुळणारी गंगा…

संस्कार अंती मोक्षासाठी
भावकल्पनांच्याच श्रद्धा
केवळ सांत्वन मनामनांचे
अखंड प्रवाहपतीत सरिता…

अव्यक्त ! सारेच दुर्बोध
कासावीस ती ताटातूट
पराधिन , असमर्थ जीव
रामेश्वरा सामोरी गंगायमुना…

*रचना क्र. १११ / २१ – ८ – २०२०*
*©️ वि.ग.सातपुते.(भावकवी.)*
*📞9766544908*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 9 =