*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सांजवेळी…!*
सांजवेळी मनात हुरहूर दाटते,
सय सख्याची काहूर माजवते…।।धृ।।
कुठे हरवले सारे ते,
जे माझ्या मनात होते!..
किती स्वप्न पाहिले होते मी,
कल्पनेत जग आणले होते…!
आठवांच्या त्या डोही मग,
मन चिंब-चिंब भिजते..
पानांआडूनी फुलांचे ते,
काय,कसे! सजणे होते…!
सांगायचे तुलाही होते,
तरी टाळले ते तूही होते!
तमाम वेली जातींनाही,
सांजवेळी झुरणे होते…!
जे होते हवे तुला ते,
‘प्रेम’ मजकडेच होते..!
म्हणूनी…,
सांजवेळी मनात हुरहुर दाटते,
सय सख्याची काहूर माजवते…!!
सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे.©®
‘स्वप्न बिलोरीतून’…
