You are currently viewing नाजूक वळण

नाजूक वळण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच समूह प्रमुख लेखक कवी पांडुरंग कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*नाजूक वळण*

ती भेटली एका नाजूक वळणावर
पावले थबकली दोघांचीही
आंतरिक ओढीने….

वळणही अनोळखी पावलेही अनोळखी
पण का कुणास ठाऊक आतुन भावलेली
अंतःकरणाच्या ओढीने….

पावलांना पावलाची साथ मिळाली
अनोळखी हुरहूर प्रेमात विरघळली
मनाच्या ओढीने….

पावलांचे रूपांतर सप्तपदीत झाले
भावनेला अर्थ मिळाला प्रेमाला कोंदण लाभलं
हृदयस्थ नात्याचे….

मनोमीलनाची स्पंदने वाढली संवेदना जागल्या
आई वडील झालो, आजी आजोबा झालो
कसे झालो कळलेही नाही…..

अजूनही जातो आम्ही त्या जुन्या वळणावर
पाऊलखुणाना वंदन करण्यासाठी
मंतरलेल्या पावलांनी..

*पांडुरंग वसंत कुलकर्णी नाशिक 7769055883*

प्रतिक्रिया व्यक्त करा