You are currently viewing माझ्या शब्दांवर नोकरी सोडणारा माणूस : डॉ. सचिन बालकुंदे

माझ्या शब्दांवर नोकरी सोडणारा माणूस : डॉ. सचिन बालकुंदे

*माझ्या शब्दांवर नोकरी सोडणारा माणूस : डॉ. सचिन बालकुंदे*

लातूर शहराचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. लातूर पॅटर्नच सगळीकडे गौरवाने उल्लेख आला जातो. या लातूर शहरातील एका डॉक्टराने वैद्यकीय अधिकाऱ्याने माझे मी आय ए एस अधिकारी होणारच हे भाषण ऐकल्यानंतर आपली चांगल्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून कलेक्टर होण्यासाठी दिल्ली गाठले .तो जरी वैद्यकीय अधिकारी जरी कलेक्टर झाला नाही तरी आज एक चांगला माणूस चांगला डॉक्टर एक चांगला उच्च पदस्थ अधिकारी झालेला आहे आणि त्या माणसाचे नाव आहे लातूरचे श्री डॉक्टर सचिन बालकुंदे. माझे भाषण लातूरच्या युनिक अकादमीने एका भव्य सभागृहात आयोजित केले होते . तो काळ स्पर्धा परीक्षेचा भरभराटीचा होता. साधारणपणे 2008 ची गोष्ट असेल. माझे व्याख्यान सुरू झाले .सभागृह तुडुंब भरले .पलीकडक्या सभागृहामध्ये स्क्रीन लावून संयोजकांनी व्यवस्था केली. तेही तुडुंब भरले .भाषण झाले .अर्थातच ते लोकांना विद्यार्थ्यांना पालकांना शिक्षकांना इतके आवडले की त्यांनी मला डोक्यावर घेतले .सर्व विद्यार्थी पालक शिक्षक गेल्यानंतर डॉक्टर सचिन बालकुंदे मला भेटले. तेव्हा ते तरुण होते. आताही ते तरुणच आहेत. मला म्हणाले. सर मला कलेक्टर होता येईल का ? मी त्यांच्या डोळ्यात पाहिले. मला आत्मविश्वास दिसला .चेहऱ्यावर कलेक्टरला साजेशी प्रवृत्ती दिसली .मी लगेच होकार दिला आणि माझ्या पडत्या फळाची आज्ञा घेऊन या माणसाने महाराष्ट्र शासनाच्या सरकारी नोकरीला रामराम ठोकला आणि दिल्ली गाठली .दिल्लीमध्ये प्रयत्न सुरू होते .पण म्हणावे तसे यश आले नाही. पण या दिल्लीच्या दीर्घकाळ वास्तव्यात त्यांच्या एक लक्षात आले की दिल्ली जवळ दृष्टी आहे व्यापकता आहे भव्यता आहे .ती त्यांनी टिपली आणि त्याचा अवलंब केला .आपल्या दिल्लीच्या कार्यकाळात त्यांनी वेगवेगळ्या प्रदेशात जाऊन आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग तिथल्या गरीब होतकरू व गरजू लोकांना उपलब्ध करून दिला .दरम्यान त्यांना एक लठ्ठ पगाराची परदेशातील नोकरी पण चालून आली. पण त्यांचे लक्ष होते लातूरकडे. माझे गाव माझी जन्मभूमी आणि म्हणून त्या लठ्ठ पगाराच्या नोकरीला लाथ मारून ते लातूरला परतले .त्यांचा मला फोन आला .सर असे असे झालेले आहे .मी माझी पूर्ण शक्ती पणाला लावली .त्यांनी पण त्यांचे सोर्सेस वापरले आणि परत ते महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्यात रुजू झाले आणि आज याच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खातात ते उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत .पण हा माणूस आयएएस जरी झाला नाही तरी आयएएस अधिकाऱ्याच्या ठिकाणी जी कौशल्य लागतात ती त्यांनी आत्मसात केलेली आहेत आणि ती आत्मसात केलेली कौशल्य ते आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये वापरत आहेत.कोरोनाच्या काळामध्ये केलेल्या गौरवपूर्ण कामाबद्दल त्यांचा महाराष्ट्र शासनाने व इतर प्रतिष्ठान यांनी गौरव केला. आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे संशोधन सतत सुरू असते. याशिवाय कोविड काळात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांनी केलेले कार्य शब्दबद्ध होऊन पुस्तक रूपाने प्रकाशित होऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये आले आहे .हा तरुण वैद्यकीय अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या संपर्कात आहे .कौस्तुभ दिवेगावकर आणि शिप्रा आग्रे जेव्हा आयएएस झाले तेव्हा त्यांच्या त्यांच्या लातूरच्या घरी माझ्यावतीने जाऊन त्यांचा सत्कार करणारा माणूस म्हणजे डॉक्टर सचिन बालकुंदे .मी जेव्हा जेव्हा लातूरला येतो तेव्हा मी लातूरमध्ये असेपर्यंत माझे आदरतिथ्य करणारा डॉक्टर म्हणजे सचिन बालकुंदे. खरं म्हणजे वैद्यकीय व्यवसायमध्ये माणूस मग्न असला तर त्याला इतर गोष्टीसाठी वेळ काढता येत नाही. पण वेळातला वेळ काढून माझ्या भेटीला येणे. माझ्या कार्यक्रमात सहभागी होणे आणि मला मिशन आय ए एस ला आमच्या आयएएस होणाऱ्या पोरांना वेळोवेळी आर्थिक मदत करणारा हा वैद्यकीय अधिकारी आज लातूर शहरासाठी जमेची बाजू आहे. आम्ही शिप्रा आगरेची आय ए एस झाल्यानंतर अमरावती मोर्शी वरड व अकोला या ठिकाणी व्याख्याने व सत्कार आयोजित केली .या कामात डॉक्टर सचिन सरांनी आम्हाला भरपूर मदत केली. शिप्राला व तिच्या वडिलांनाअमरावतीला आणणे व सर्व कार्यक्रमातून लातूरला परत नेणे हे काम त्यांनी आनंदाने केले. काल-परवा मी दयानंद महाविद्यालयामध्ये व्याख्यानाला आलो होतो. डॉक्टर जगन्नाथ पाटील सचिव श्री बियाणीजी व प्राचार्य गायकवाड यांनी हे व्याख्यान आयोजित केले होते. डॉक्टर साहेब बरोबर व्याख्यानापूर्वी मला भेटले .चर्चा केली .चहापान झाले .आम्ही कार्यक्रमाला निघालो आणि ते आपल्या ड्युटीवर निघूनही गेले .कारण ते ज्या क्षेत्रात आहेत त्या क्षेत्राचे महत्त्व वेळेचे महत्व याचे भान त्यांना आहे आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये राहून परोपकारी वृत्तीने लोकांचे किती कल्याण करता येईल या भावनेने त्यांनी स्वतःला झोकुन दिलेले आहे .अशा या परोपकारी सद्गुनी डॉक्टर सचिन बालकुंदे व त्यांच्या परिवाराला या मंगल प्रसंगी शुभेच्छा दिल्याशिवाय राहवत नाही .आज शरीराने मी जरी लातूरात नसलो तरी मनाने त्यांच्याबरोबर होतो आहे आणि राहिलही .प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती कॅम्प महाराष्ट्र. 9890967003

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा