बांदा टोलनाकाप्रश्नी मोक्का न्यायालयात दावा

बांदा टोलनाकाप्रश्नी मोक्का न्यायालयात दावा

बांदा टोलनाकाप्रश्नी मोक्का न्यायालयात दावा

बांदा / प्रतिनिधी :-

बांदा- सटवडी येथील महाराष्ट्र शासनाच्या सीमा तपासणी नाक्‍याच्या जमीन संपादन प्रक्रियेपासून ते उभारणीपर्यंतचे काम करताना या प्रक्रियेत शासकीय अधिकार्‍यांकडून अनेक बेकायदेशीर कामे केली आहेत. या शासकीय प्रकल्पात काम करणाऱ्या बऱ्याच अधिकाऱ्यांकडून बऱ्याच ठिकाणी कर्तव्यात कसूर केल्याचेही समोर आले आहे‌. त्यामुळे तेथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी कर्तव्यात कसूर करण्याच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सामूहिक गुन्हेगारी कायदा म्हणजेच मोक्का न्यायालयात दावा दाखल केला आहे.

याबाबतीत सुनावणी ५ ऑक्टोंबर रोजी होणार असल्याचे कल्याणकर त्यांनी सांगितले. याबाबत माहिती देताना कल्याणकर म्हणाले, प्रशासनाचे अधिकारी प्रकल्प राबविताना नियमांचे पालन करत नाहीत. यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करत असल्यामुळे शेवटी मोक्का कोर्टात त्या विरुद्ध दाद मागण्याचे निश्चित केले आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकार्‍यांची सखोल चौकशी करून दोषी असल्यास दंडात्मक कारवाईसह, चौकशीच्या नोटिसा बजावण्याची मागणी आपल्या दाव्यामध्ये केली असल्याचे कल्याणकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा