You are currently viewing ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी तर्फे बॅ. नाथ पै कुडाळ कोविड केअर सेंटरला मदत..

ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी तर्फे बॅ. नाथ पै कुडाळ कोविड केअर सेंटरला मदत..

संस्थेचे विश्वस्त श्री.चेतन गंगावणे यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला मदत

कुडाळ :

आज दिनांक २९ मे २०२१ रोजी बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपी कोविड केअर सेंटर कुडाळ येथे विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे या संस्थेने कोरोना उपचार घेत असलेले पेशंटना पाण्याचे बॉक्स, अंडी व केळी चे बॉक्स देण्यात आले. संस्थेचे विश्वस्त श्री. चेतन गंगावणे यांची मुलगी नव्या हिच्या वाढदिवसा निमित्त हे देण्यात आले. यावेळीं श्री.उमेश गाळवणकर बॅ नाथ पै संस्था अध्यक्ष, श्री.एकनाथ गंगावणे, श्री.चेतन गंगावणे, श्री.अरुण मर्गज, श्री. प्रवीण गंगावणे इतर उपस्थित होते. संस्थेच्यावतीने नव्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − three =