You are currently viewing माध्यमिक शिक्षक पतपेढीसाठी ९७.९७ टक्के मतदान

माध्यमिक शिक्षक पतपेढीसाठी ९७.९७ टक्के मतदान

ओरोस

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकिसाठी ९७.९७ टक्के चुरशीचे मतदान झाले आहे. १५ संचालक पदासाठी ६२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून शुक्रवारी सकाळी ९ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील संस्थेच्या पतपेढी सभागृहात मतमोजणी सुरू होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला यादव यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा