You are currently viewing कोलगाव ग्रामपंचायत निवडणुकीकरिता तीन अर्ज दाखल

कोलगाव ग्रामपंचायत निवडणुकीकरिता तीन अर्ज दाखल

सावंतवाडी :

तालुक्याच्या ११ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी कोलगाव ग्रामपंचायत निवडणुकीकरिता तिघांनी अर्ज दाखल केले. कोलगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे या ग्रामपंचायतीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीकरिता 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. सुट्टीचे दिवस वगळून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात येणार आहेत. मात्र सलग तीन दिवस सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हातघाई पाहायला मिळणार आहे. १५ जानेवारी रोजी निवडणूक मतदान होणार आहे तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. आज पहिल्या दिवशी कोलगाव ग्रामपंचायती करिता प्रभाग एक मधून तिघांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये प्रभाग १ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करिता प्रतिक्षा धुरी, सर्वसाधारण जागे करता कुलदीप राऊळ तर सर्वसाधारण महिला या जागेसाठी सरिता सावंत या तिघांनी अर्ज दाखल केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =