You are currently viewing बीएसएनएलच्या पथकाची बांद्यात पाहणी

बीएसएनएलच्या पथकाची बांद्यात पाहणी

*बीएसएनएलच्या पथकाची बांद्यात पाहणी*

*नागरिकांच्या तक्रारीची घेतली दखल*

बांदा

बांदा शहरात सुरू असलेला बीएसएनएलच्या नेटवर्कचा खेळ-खंडोबा तसेच सध्याच्या ऑनलाईनच्या जगात सर्व व्यवहार ऑनलाइन होत असताना बीएसएनएलच्या अनियमित डाटाबाबत व त्यामुळे नागरिकांच्या होणाऱ्या नुकसानीबाबत येथील श्री हेमंत विनायक दाभोलकर व श्री गुरुदत्त सुरेश कल्याणकर यांच्या तक्रारीची दखल घेत आज बीएसएनएलचे पथक बांद्यात दाखल झाले.
श्री दाभोलकर,कल्याणकर व बांदा ग्रामपंचायत सदस्य श्री प्रशांत बांदेकर यांनी सदर पथकाला बांदा मुख्य टॉवर पासून ते संपूर्ण परिघात बांदा शहरात फिरवून ठिकठिकाणी मिळणाऱ्या रेंज,फ्रिक्वेन्सी तसेच डाटा स्पीडची नोंद घेण्यास लावली. पाहणीअंती सदर पथकाने सर्व तक्रारी मान्य करत तांत्रिक अडचण असल्याचे मान्य करत यावर वरिष्ठ पातळीवर कळवत तातडीने कारवाई करण्यात येईल व सर्व सेवा पुन्हा पूर्ववत सुरळीतपणे सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.
श्री हेमंत दाभोलकर व गुरु कल्याणकर यांच्याच प्रयत्नामुळे सदर बीएसएनएलच्या टॉवरला बॅकअप बॅटऱ्या बसवण्यात आल्या होत्या.ज्यामुळे वीज गेल्यावर नेटवर्क जाण्याची खूप मोठी समस्या दूर झाली होती.त्यांच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 1 =