You are currently viewing *छत्रपती संभाजीनगर येथे रंगणार पहिले राज्यस्तरीय काव्य समेंलन

*छत्रपती संभाजीनगर येथे रंगणार पहिले राज्यस्तरीय काव्य समेंलन

*छत्रपती संभाजीनगर येथे रंगणार पहिले राज्यस्तरीय काव्य समेंलन*

(छ. संभाजीनगर)काळीज माझं साहित्य या सामाजिक संस्थे मार्फत पहिले भव्य दिव्य मराठी राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 4 जुन 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांत दादा वानखेडे ( प्राध्यापक , ज्येष्ठ साहित्यिक, प्रकाशक, संपादक, पुणे) तसेच उद्घाटक सौ. संगिताताई भाऊसाहेब जामगे (ज्येष्ठ साहित्यिका, समाज सेविका,आखिल भारतीय मराठी साहित्य परिषद प्रदेश उपाध्यक्ष) असणार आहेत.
या काव्य संमेलनासाठी प्रमुख पाहुणे सौ. लताताई पगारे (जि.परिषद अध्यक्षा छत्रपती संभाजीनगर), श्री. गुलाबराजा फुलमाळी (कवि, गीतकार , संपादक साहित्य दर्पण ) , कवि ,गझलकार श्री रज्जाक शेख , डॉ. सुशिल सातपुते (कवि, साहित्यिक, प्राध्यापक) असणार आहेत.उद्योजक प्रकाश भोसले, छ. संभाजी नगर्, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण हेंबाडे हे उपस्थित राहणार आहेत.

नवोदित कवि कवयीत्री यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी या काव्य संमेलनाचे आयोजन केले आहे. पुरस्कार समारोह तसेच कवि समेंलन जिजाऊ भवन, बाबा पेट्रोल पंप जवळ , छत्रपती संभाजीनगर येथे ०४ जुन रोजी सकाळी १०:०० वाजता सुरू होईल.
उदघाटन,मान्यवरांचा सन्मान व पुरस्कार वितरण सोहळा , कवी संमेलन यामध्ये सहभागी कवींना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, मानाचा फ़ेटा दिला जाईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रानकवी श्री जगदीप वनशिव (पुणे) , कवयित्री वैशाली कंकाळ हे करणार आहेत.
तरी महाराष्ट्रातील कवि -कवयित्रींनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून आपले हक्काच्या व्यासपीठावर स्थान ग्रहण करावे असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा कवयीत्री सुरेखा बेंद्रे , सरपंच, विजय पाटील, अर्चना राहुरकर डॉ. शुभम बेंद्रे यांनी यांनी केले आहे. कवी कवयीत्री यांनी सहभाग नोंदविण्यासाठी ८६२३८८२८०५ या नंबरवर संपर्क करावा.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा