You are currently viewing देवेंद्र खडसे यांना जीवन गौरव पुरस्कार 

देवेंद्र खडसे यांना जीवन गौरव पुरस्कार 

 

रिलायन्स उद्योग समूहाचे माजी राज्य समन्वयक व सुप्रसिद्ध उद्योजक श्री देवेंद्र खडसे यांना मिशन आयएएस चा यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 20 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता वाशिम येथील वाटाणे मंगल कार्यालयामध्ये संपन्न होणार आहे.

 

श्री देवेंद्र खडसे हे वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी विपरीत परिस्थितीमधून झुंज देऊन आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत राहून ते रिलायन्स उद्योग समूहाच्या राज्य समन्वयक पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत.

 

श्री देवेंद्र खडसे हे मिशन आयएएस ह्या स्पर्धा परीक्षेला वाहिलेल्या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष असून त्यांनी आतापर्यंत मुंबई येथे विविध भागात भागात सुमारे 121 स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतलेल्या आहेत. वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक धार्मिक उपक्रमामध्ये ते सातत्याने सहभागी झालेले असून वेळोवेळी अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना त्यांनी भरीव मदत केलेली आहे.

 

मुंबईसारख्या महानगरामध्ये 121 कार्यशाळा घेणे म्हणजे ही तारेवरची कसरत आहे. त्यासाठी त्यांनी तन मन व धनाने प्रयत्न करून मुंबईच्या विविध भागात 121 कार्यशाळा घेऊन स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत आगळीवेगळी जाणीव जागृती केलेली आहे.

त्यानिमित्त त्यांना वेगवेगळ्या संस्थांनी वेळोवेळी गौरविलेले आहे.

 

श्री देवेंद्र खडसे हे उत्कृष्ट लेखक असून त्यांनी आतापर्यंत जवळपास 13 पुस्तके लिहिलेली आहेत. शिवाय त्यांच्या कार्यावर गौरव ग्रंथ देखील प्रकाशित झालेला आहे. त्यांच्या या कार्याची गौरव घेऊन मिशन आय ए एस.च्या कार्यकारिणीने त्यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार देण्याचे घोषित केलेला आहे .त्याप्रमाणे या कार्यक्रमाचे नियोजन दिनांक 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता वाशिम येथील वाटाणे मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आले आहे. याच वेळी महाराष्ट्राची लोकधारा या लोकप्रिय कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे.त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा